विधानमंडळाच्या धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समितीवर आमदार बबनराव शिंदे यांची नियुक्ती.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळ समित्यांची रचना करण्यात आली असून यामध्ये महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणेच्या समितीवर सोलापूर जिल्ह्यातून माढ्याचे आ.बबनराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याचा फायदा गरीब व दुर्बल घटकांतील रुग्णांना होणार आहे.


महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी विधानमंडळाच्या विविध समित्या जाहीर केलेल्या आहेत. त्यामधील रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यास  महत्वाची मानली जाणारी "धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणेची संयुक्त समिती" या समितीचे अध्यक्ष म्हणून विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे काम पाहणार आहेत या समितीवर  माढ्याचे आ. बबनराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने राज्यातील सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमानुसार धर्मादाय खाजगी रुग्णालयात गरीब लोकांसाठी ज्यांचे वार्षीक उत्पन्न 85.000 रु. आहे अशा कुटुंबांना मोफत तसेच सवलतीच्या दरामध्ये उपचार करणे रुग्णालयांवर बंधनकारक असते परंतू सध्या  रुग्णालयांकडून गोर गरीबांची  लुट चालू आहे. अशा रुग्णालयांमध्ये गरींबासाठी  10 टक्के खाटा राखीव असतात त्याचा उपयोग समाजातील गरीब घटकांना होत आहे का, त्यांना वैद्यकीय उपचार मिळत नसतील तर अशा हॉस्पिटलची तपासणी करण्याचे काम ही समिती करते. धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या तसेच शासनाने ज्या रुग्णालयांसाठी जागा दिलेल्या आहेत वा अन्य प्रकारे शासन मदत करते अशा सर्व रुग्णालयांचा यामध्ये सामावेश असतो.मुंबई,पुणे,सोलापूर,सांगली यासह राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये नामांकित रुग्णालयामध्ये १०% राखीव खाटांची तरतूद केलेली आहे  त्यामुळे रुग्णांच्या मदतीसाठी या समितीचा मोठा उपयोग होतो. आ. बबनराव शिंदे यांच्या निवडीमुळे मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना याचा लाभ होणार आहे.


यापुर्वी आमदार बबनराव शिंदे यांनी विधानमंडळाच्या आश्वासन समिती, पंचायती राज समिती, रोजगार हमी योजना समिती यावर अध्यक्ष तर इतर अनेक समित्यांवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे त्यांच्या अनुभवाचा  फायदा गोरगरीब जनतेला होणार आहे.


चौकट -


            राज्यातील धर्मादाय खाजगी रुग्णालयांनी शासनाचा लाभ घेतलेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये निर्धन व समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत उपचाराबरोबर काही ठिकाणी सवलतीच्या दरात इलाज होणार आहे. यामध्ये मुंबई मधील ब्रीच कॅन्डी, बॉम्बे हॉस्पिटल, हिरानंदानी,जसलोक,लिलावती,सैफी हॉस्पिटल,धिरुभाई अंबानी , यासह अनेक हॉस्पिटल आहेत तसेच पुणे येथील रुबी,जहांगीर,वाडीया भारती,पुना, केईएम, सह्याद्री, संचेती, दिनानाथ हॉस्पिटल येथे उपचार होणार आहेत. याचबरोबर आश्विनी हॉस्पिटल,कुंभारी,सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल,जगदाळे -मामा , कासलीवाला, इंडियन कॅन्सर सोसायटी यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये 10 टक्के राखीव खाटा मिळणार आहेत. त्यामुळे रुग्णांना ॲडमिट करण्यापूर्वी त्यांचे नातेवाईकांनी  85 हजार उत्पन्नचा दाखला व आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित हॉस्पिटलच्या चॅरिटी ऑफीस मध्ये  देऊन नोंदणी करावी  या संदर्भात काही अडचण असल्यास माझेशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget