वृत्तसंस्था // प्रतिनिधी
टोळी ता परोळा,जिल्हा जळगाव येथील चर्मकार समाजातील २०वर्षीय विद्यार्थिनीवर काही तरुणांनीअत्याचार करून तिला विष पाजून निघृण हत्या केली.यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या,महिला आरोपी सह अन्य आरोपींना तत्काळ अटक करावी.संबंधित स्थानिक पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी.या प्रकरणात सरकारी वकील म्हणुन उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
व हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.निकाल लागेपर्यंत त्यामधील आरोपींना जामीन देण्यात येऊ नये. मुलीच्या कुटुंबाचे संरक्षण मिळावे.
आणि पुनर्वसन करावे.चर्मकार समाजातील मुलीला न्याय द्यावा.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.