वृत्तसंस्था // प्रतिनिधी
फाटक्यांचा आवाज आणि त्यातील रासायनिक पदार्थांचे हृदय व फुफ्फसावर होणारे दूरगामी परिणामी लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत शक्यतो फटाके फोडणे टाळावेत.असा सल्ला स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडीसीन विभागाचे प्रमुख तथा प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांनी दिला आहे.
दिवाळीसण सुरू झाला आहे. यंदा कोरोनाच्या साथीमुळे दिवाळीत फटाके फोडतांना नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी.अनेक फटाके आवाजापेक्षाही घातक रास्यानिक पदार्थांचा उत्सर्ग करीत असल्याचे तज्ञांचे मत आहे.यात प्रमुख्याने चायनामेड व विविध तयार करण्यात आलेले फटाके कानांपेक्षा किडनी,डोळे,हृदय, फुफ्फुस यांच्यासाठी हानीकारक ठरत असल्याने नागरिकांनी काळजी व दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच काही फटाक्यांमध्ये जस्त,तांबे, लोखंड,अॅल्युमिनियम आदिंचा वापर केला जातो.अशा धातूंच्या संयोगाने सल्फरडाय ऑक्साईड, पोटॅशियम नायट्रेट,बेरियम सारखे शरीरावर अत्यंत दूरगामी करणारे घटक या माध्यमातून उत्सर्जित होतात. त्यामुळे डोळ्यांचा विकार, झोप न लागणे, हृदय जोरात धडधडणे, रक्तदाब, किडनी व फुफ्फुसांचे आजार उद्भवू शकतात. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना देखील फुफ्फुसाचा त्रास जाणवत असल्याने मोठ्या आवाजाचे तसेच रास्यानिक पदार्थांचा समावेश असलेले फटाके घातक आहेत. या वर्षी कोरोनामुळे दरवर्षीपेक्षा परिस्थिती वेगळी आहे.कोरोनाच्या दुसºया लाटेची संभाव्य शक्यता ग्राह्य धरून पुढील आरोग्यावर होणारे धोके टाळण्यासाठी फटाके फोडणेच टाळा,असे डॉ. बिराजदार यांनी सांगितले.
असे आहेत फटाक्यांचे दूरगामी परिणाम
- फटाक्यातील वायू व इतर धातूंसोबत जळणाऱ्या अॅल्युमिनियिममुळे उच्च परिणामाचा टॉक्सिक वायू वातावरणात मिसळतो यामुळे किडनीवर विपरीत परिणाम होतो. सूक्ष्म परिणामुळे मेंदूचे विकार उद्भवण्याची शक्यता अधिक असते.
- सल्फरडाय ऑक्साईड आतडे, फुफ्फुस, कान, डोळे यांच्यासाठी घातक आहेत.
- पोटॅशियम नायट्रेटमुळे श्वसनाचे विकार जडतात.
- फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते. तसेच हृदयाचे ठोके वाढून रक्तदाब वाढतो.
लहान मुले, कुटुंबातील वृद्ध यांच्या आरोग्यावर या फटाक्यांचा मोठा दुष्परिणाम होतो

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.