प. कुरोली येथील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून केली रस्त्याची दुरुस्ती






वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेला देवडेपाटी ते शनि मंदिर रस्ता प्रहार संघटनेचे सिद्धेश्वर पाटील व शिवाजी नाईकनवरे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शनी मंदिर ते देवडेपाटी या रस्त्यावर शेकडो लोकवस्ती आहे याच रस्त्यावरून हजारो टन उसाची जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांना गाळपासाठी पाठविला जातो मात्र जड वाहतूक यामुळे हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे यावर्षी सलग पाच महिने झालेल्या पावसामुळे रस्ता आणखीनच खचल्यामुळे दुचाकी चारचाकी वाहनेही ये-जा करणे बंद झाले आहे.

याशिवाय साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न बिकट झाली आणि हा रस्ता ग्रामस्थांनी स्वखर्चाने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे यावेळी सिद्धेश्वर नाईकनवरे, शिवाजी नाईकनवरे, अड. संतोष नाईकनवरे, ज्ञानेश्वर जवळेकर, नौशाद शिकलकर, विठ्ठल मगर, नागनाथ नाईकनवरे, केशव जाधव उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget