सोलापूरा शहरात संचारबंदी लागू ! रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत घराबाहेर फिरु नका





सोलापूर // प्रतिनिधी 

ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्याने सावधगिरी म्हणून राज्य सरकारने राज्यातील सर्वच शहरांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्र संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्‍यक कामांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी आदेश काढत संचारबंदी आज (मंगळवारी) रात्री 11 पासून लागू होईल, असे स्पष्ट केले.   रात्र संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्वच आस्थापना रात्री 11 नंतर सुरु राहणार नाहीत. नागरिकांनी रात्री 11 पूर्वी घरी जाणे अपेक्षित आहे. या काळात दिवसा घराबाहेर पडणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे. विनाकारण तथा नियमांचे उल्लंघन करीत शहरात इतरत्र फिरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु, राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. तरीही ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसराच विषाणू आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका व पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. या काळात परदेशातून येणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींना क्‍वारंटाईन करुन त्यांची 'आरटीपीसीआर' टेस्ट केली जाणार आहे. त्र, आपल्याकडे विमानसेवा नसल्याने परदेशातून कोणी येणार नाही, अशी शक्‍यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तविली आहे. तरीही बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांवर तथा व्यक्‍तींवर वॉच राहील, असे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी 'सांगितले.  

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget