फाईल अंतिम सहीकरीता मा. मुख्यमंत्री महोदयांकडे
सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहरातील जानेवारी महिन्यामध्ये गेल्या 800 ते 900 वर्षापासून ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रा दरवर्षी भरत असते. या यात्रेमध्ये शहरातील व आजूबाजूच्या शहरजिल्हयातून बहूसंख्य भाविक यात्रेकरीता येत असतात.
श्री सिध्देश्वरांचे योगदंडाचे प्रतिक असे विविध समाजाचे 7 नंदीध्वज असे सदर नंदीध्वजाचे दि. 12 ते 16 जानेवारी या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेस खंड पडू नये म्हणून या यात्रेमध्ये श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी व मानकरी यांनी भाविकांची संख्या मर्यादित ठेवून शासनाच्या निर्बंधाचे पालन करून यात्रा संपन्न करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. त्यामध्ये प्रत्येक नंदीध्वजाचे 100 नंदीध्वज धारक असे एकूण 700 नंदीध्वज धारक व सेवेकरी, तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरीक व यात्रेतील मानकरी असे 300 भाविक मिळून एकूण 1 हजार लोकांना सहभागी करण्यात यावे असे त्या प्रस्तावात नमूद करण्यात आले. त्यानुसार दि. 11 डिसेंबर 2020 रोजी मा जिल्हाधिकारी, श्री सिध्देश्वर पंचकमिटी अध्यक्ष श्री. धर्मराज काडादी व इतर सदस्य आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत बेठक झाली. त्यानुसार सदरचा प्रस्ताव मा. शासनाकडे पाठविण्याचे ठरले व त्याचा पाठपुरावा आमदार प्रणिती शिंदें यांनी करावा असे मा. जिल्हाधिकारी व श्री सिध्देश्वर पंचकमिटीने सुचविले. त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ श्री. किशोर राजे निंबाळकर, मा. सचिव, आपत्ती व व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधून सदरचा प्रस्ताव तात्काळ मा. मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करावा असे सांगितले. त्यानुसार श्री. किशोर राजे निंबाळकर, मा. सचिव, आपत्ती व व्यवस्थापन यांची सही होवून हा प्रस्ताव आज दि. 23 डिसेंबर 2020 रोजी श्री. संजय कुमार, मा. मुख्यसचिव महाराष्ट् शासन यांच्या सहीने मा. मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावामध्ये श्री सिध्देश्वर यात्रा घेण्यासंबंधीचे सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. यावर औपचारीकता म्हणून मा. मुख्यमंत्री यांची सही राहिलेली आहे ती सही लवकरच होईल अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलेली आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.