प्रणव परिचारक यांचे फेसबुक पोस्ट द्वारे वाढदिवस साजरा न करण्याचे सर्व व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना आवाहन!

 



सोलापूर // प्रतिनिधी 

दिनांक 28 डिसेंबर रोजी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेतृत्व खर्डी चे उपसरपंच माननीय प्रणव दादा परिचारक यांचा वाढदिवस आहे. पण सद्यस्थितीला संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाव्हायरस मुळे व व महाराष्ट्रातील राजकारणातील समाजकार्यातील ऋषितुल्य कर्मयोगी व्यक्तिमत्व कै. सुधाकरपंत जी परिचारक (थोरले मालक/आजोबा) यांचे दुःखद निधन झाल्यामुळे प्रणव दादांनी आपल्या सर्व पांडुरंग परिवारातील व समस्त परिचारक कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक फेसबुक पोस्टद्वारे आवाहन केले आहे की आपण कोणत्याही आणि कसलेही प्रकारचा माझा वाढदिवस साजरा करू नका. तसेच कुठल्या प्रकारचे डिजिटल बॅनर अथवा हारतुरे फुले व कसल्याही शुभेच्छा स्वीकारणार नसल्याचे या पोस्ट द्वारे त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे.


 प्रणवदादा परिचारक यांची भावनिक फेसबुक पोस्ट

[तमाम स्नेहपरिवार, आप्तस्वकीय यांना मी नम्रतापूर्वक आवाहन करतो की, सोमवार दि.28 डिसेंबर 2020 रोजी माझा वाढदिवस आहे. पण गेली दहा-अकरा महिने सर्व जगामध्ये सुरू असलेल्या कोरोना च्या थैमानामुळे अनेक कुटूंब, व्यवसाय उध्दवस्त झाले. हे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नाही.  कोरोना विषाणू मुळे आपल्या पंढरपूर तालूक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकारण- समाजकारणती ॠषितुल्य व्यक्तिमत्व आपले कुटुंबप्रमुख श्रध्येय स्व. सुधाकर  आजोबा तसेच मंगळवेढा तालूक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय चरणु (काका) पाटील.  वै.भागवताचार्य वा.ना.आजोबा उत्पात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वै. ह.भ.प. रामदास महाराज जाधव आपल्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारतनाना भालके तालूक्याच्या राजकारणातील ज्येष्ठ स्नेह स्व. राजबापू पाटील आशा धार्मिक, सामाजिक-राजकिय क्षेत्रातील पिढीलाच तसेच सामाजिक-राजकीय कौटुंबिक हितसंबंधातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींना आपण गमावून बसलो. या सर्व प्रेरणादायी व्यक्तींनी घालून दिलेल्या वाटेवर त्यांनी केलेल्या सकारात्मक कार्याचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, आपल्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द राहीनच पण अशा सांप्रत परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे मला उचित वाटत नाही.]

त्यामुळे माझ्या वाढदिवसाचे औचित्य म्हणून कोणतेही उपक्रम,  शुभेच्छांचे बॅनर अथवा हार फुलांच्या शुभेच्छा मी स्वीकारणार नाही याची सर्व स्नेह परिवारांनी नोंद घ्यावी.

 प्रणव (दादा) परिचारक उपसरपंच खर्डी

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget