पालखी मार्गावरील 1811 सालातील बाजीराव विहिरीचा इतिहास नव्याने समोर, विहीर वाचवण्यासाठी

  


सोलापूर // प्रतिनिधी 

देश विदेशात पुरातन वस्तू आणि वास्तूला आपल्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीने जतन केले जाते. मात्र वारकरी संप्रदायाच्या नावाने सुरु असणाऱ्या विकास कामात वारकरी संप्रदायाचे वैभवच नामशेष होण्याच्या मार्गावर असताना आता पुरातत्व विभाग ही विहीर वाचवायला पुढे आला असून सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना एक पत्र देत ही बाजीराव विहीर वाचवण्याची विनंती केली आहे.

दरम्यान या विहिरीचा इतिहास आता नव्याने समोर आला असून या विहिरीचे बांधकाम 1811 साली झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. दुसरे बाजीराव पेशवे आषाढी वारीसाठी पंढरपूरला नियमित वारीला येत असताना त्यांनी ही विहीर व 15 बिघे जमीन त्या काळातील सरदार खाजगीवाले यांचेकडून घेत ती विठ्ठल मंदिराला दिली होती. विठुरायाला रोज लागणाऱ्या तुळशी व फुलांची सोय या विहिरीच्या पाण्यावर शेजारील जमिनीत करून त्याचा वापर देवासाठी करावा अशी बाजीराव पेशवे यांची संकल्पना होती. त्यानुसार त्यांनी या जमीन व विहिरीच्या बदल्यात खाजगीवाले यांना 15 बिघे जमीन देताना विहिरीचे वेगळे 400 रुपये दिल्याचे पुरावे समोर आले आहेत . त्यामुळे ही विहीर थेट विठ्ठलाची विहीर अशी त्याकाळी ओळखली जात असल्याचे इतिहास अभ्यासक व मोडी लिपीचे तज्ज्ञ राज मेमाणे यांनी सांगितले आहे. याबाबतचे सर्व पुरावे मेमाणे यांच्याकडे असून त्यांनी याबाबतचे एक पत्र पुरातत्व विभागाला लिहिल्यावर पुरातत्व विभागाने ही विहीर पुरातन असल्याचे मान्य करीत रस्त्याच्या बांधकामात पडली जाऊ नये अशी विनंती करणारे पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget