वृत्तसंस्था // प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसापासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असुन यामध्ये आता पर्यंत तीन नागरिकांचा बळी गेला आहे वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालेले नाही बिबट्या ज्या भागात आहे त्या भागात प्रचंड प्रमाणात ऊसाचे पीक आहे त्या मुळे बिबट्याचा शोध घेण्यासाठी अडचण येत आहे त्या मुळे शासनाने शोध मोहीम साठी हेलिकॉप्टर ची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे
यावेळी पाठविलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे की करमाळा तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसापासून करमाळा जामखेड रोड. मांगी. वडगाव रावगाव. लिंबे वाडी अज॓नडोह चिखलठाण आदी भागात बिबट्यानी दहशत निर्माण केली आहे शेतकरी शेतात काम करण्यासाठी जात नाही तर ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी जिवावर उदार होऊन ऊसतोडीसाठी जात आहे त्याच्या सुरक्षेतेचा प्रश्र निर्माण झाला असुन शासनाने त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी जे साखर कारखाने ऊस नेत आहेत त्यांनी या ऊसतोड कामगारांची सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी अन्यथा बिबट्याला जेरबंद करे पर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्यात यावे असे मोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे ईमेल द्वारे मागणी केली आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.