पत्रकारांच्या बलिदानाचा राज्य सरकार ला विसर

 


सोलापूर // प्रतिनिधी

जगात देशात अन महाराष्ट्र राज्यात कोरोना सारख्या महामारी ने अक्षरशः थैमान व धुमाकूळ घातला असून त्याचे  पडसाद देखील मोठया प्रमाणात उमटले आहेत या महामारी ने शेकडो लोक  मृत्यू पावले आहेत केंद्र सरकार व राज्य सरकार ने या  जीवघेण्या महामारी काळात सफाई कर्मचारी डॉक्टर पोलीस कर्मचारी यांना तब्बल पन्नास लाखाचे विमा संरक्षण देऊन त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी उचलली आहे

पत्रकारांचा बळी आणि राजकीय उदासीनता

कोरोना महामारी काळात राज्यातील अनेक पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून जीवघेन्या कोरोना महामारी बाबत केंद्र सरकार राज्य सरकार पोलीस प्रशासन, वैधकीय प्रशासन महापालिका प्रशासन ने जनतेला कोरोना महामारी बाबत आदेश निर्देश,विविध  उपाययोजना गल्लीबोळात फिरून जनतेला बातमी च्या माध्यमातून पोहोचवले असून  जनजागृती केली आहे

पत्रकारांना विमा संरक्षण

कोरोना जीवघेणा आजार असल्यामुळे पत्रकारांना देखील पन्नास लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती ने लावून धरली होती याबाबत थेट मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती पत्रकार सुरक्षा समिती च्या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी कोरोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाल्यास पन्नास लाख रुपयांचा विमा मंजूर केला होता

पत्रकारांचा मृत्यू व उदासीन सरकार

कोरोना काळात जवळपास 24 पत्रकारांचा मृत्यू झाला असून 400 पत्रकारांना कोरोना झाला आहे परंतु राज्य सरकार ने मृत्यू पावलेल्या पत्रकारांना अद्याप पन्नास लाख रुपये दिले नाहीत ही बाब खूपच गंभीर व वेदनादायी असून कोरोना काळात जीवाची बाजी लावून बातमी करणाऱ्या पत्रकारांच्या बलिदाना चा राज्य सरकार ला विसर पडलेला असून या बाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने यापुढे आंदोलने त्रीव्र करून कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला नक्कीच आधार देण्याचा प्रयत्न करणार

यशवंत पवार

प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget