सोलापूर // प्रतिनिधी
पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश येतो त्यापैकी सोलापूर जिल्ह्यांमध्ये 53813 पदवीधर मतदारांपैकी 33451 सुज्ञ मतदारांनी हक्क बजावला आहे. सोलापूर जिल्ह्यात 62 . 47 टक्के मतदान झालेले आहे. जिल्ह्यातील सुज्ञ पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यांमध्ये सांगोला 3899 पैकी 2627, मंगळवेढा 3807 पैकी 2459, पंढरपूर 6429 पैकी 4141, करमाळा 2895 पैकी1771, माढा 5409 पैकी 3369, बार्शी 5562 पैकी 3288, मोहोळ 3361 पैकी 2255, अक्कलकोट 2100 पैकी 1548, दक्षिण सोलापूर 1828 पैकी 1027, उत्तर सोलापूर 379 पैकी 162, सोलापूर शहर 11319 पैकी 6443, माळशिरस 6550 पैकी 4361, मतदारांनी सोलापूर जिल्ह्यात तालुकानिहाय मतदानाचा हक्क बजावला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.