वृत्तसंस्था // प्रतिनिधी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येतोय. टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने विश्व विक्रमी कामगिरी केली आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यात वेगवान 12 हजार धावा करण्याची ‘विराट’ कामगिरी केली आहे. याआधी सर्वात कमी डावात 12 हजार धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता.
242 डावात 12 हजार धावा
विराटने 12 हजार धावांचा टप्पा 242 डावांमध्ये पार केला आहे. टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकरने 300 डावात 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा सहावा खेळाडू ठरला आहे. कोहली आणि सचिन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग, श्रीलंकेचा कुमार संगकारा, सनथ जयसूर्या आणि महेला जयवर्धनेनेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
डावनिहाय 12 हजार धावा
विराटने एकूण 242 डावांमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 300 डावांमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या. म्हणजेच सचिनच्या तुलनेत विराटने 58 डावांआधी ही कामगिरी केली आहे. तसेच ऑस्ट्रलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने 314, कुमार संगकाराने 336, सनथ जयसूर्याने 379 आणि महेला जयवर्धनेने 399 डावांमध्ये 12 हजार धावा केल्या आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.