(पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीला अखेर यश)
सोलापूर // प्रतिनिधी
गेल्या आठ ते नऊ महिने कोरोना रोगाच्या काळात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद्र सरकार मदत करणार व पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन द्वारे मागणी केली होती या पत्रकारांच्या रास्त मागणीला यश आले असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारने याची घोषणा केली असं म्हणने वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रात गेल्या चार ते आठ महिन्यात 54 पत्रकार मृत्यूमुखी झाले. यातील जवळपास 50 पत्रकारांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. यामध्ये कोरोनाने निधन झाल्यास संबंधित पत्रकारांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.. परंतू 54 पैकी एकाही पत्रकारांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून दमडीची मदत मिळाली नाही. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक दिलासा देणारी बातमी मिळाली असून या जेवढ्या पत्रकारांच निधन कोरोनानं झाले अशा पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद़ सरकार वतीने आर्थिक मदत देणार आहे.. *Journalist welfare scheme* ( जनर्लिस्ट वेल्फेअर स्किम) या अंतर्गत ही मदत दिली जाणार असल्याची माहिती मिळात आहे. जे पत्रकारांचा मृत्यू झाला हा अधिस्वीकृती धारक पत्रकार असलाच पाहिजे असे कोणतेही बंधन नाही. मात्र दिवंगत व्यक्ती पत्रकार होता याचे पुरावे द्यावे लागतील. शिवाय मृत्यूचे प्रमाणात आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल.व अर्ज *Additional Director General, press facilities, PIB* यांच्या नावाने prspib101@gmail.com या मेलवर पाठवावे असे सांगण्यात आले आहे
राज्यातील ज्या पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले त्यांच्या नातेवाईकांनी अथवा मित्रांनी वर नमूद केलेल्या मेल आयडीवर आपला अर्ज पाठवावा.
चौकोट
कोरोना काळामध्ये ज्या पत्रकार यांचा मृत्यू कोणामुळे झाला होता त्या सर्व पत्रकारांना पन्नास लाख रुपयाची तातडीने मदत करण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली होती. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बाबत नाराजी व्यक्त करत राजीनाम्याची सुद्धा मागणी यावेळी यावेळी करण्यात आली होती. सर्व पत्रकारांनी कुरणा काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वार्तांकन करून आपला जीव डोक्यात घालून कोरोना काळातील बातम्यांचा पाठपुरावा केला होता त्यामुळे अशा सर्व मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने तातडीने 50 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रव्यवहाराचा द्वारे महाराष्ट्र शासनाकडे केली होती.
यशवंत पवार
(प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती)

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.