पंढरीच्या डॉक्टरांना लुटले
सोलापूर // प्रतिनिधी
मध्यरात्रीच्या वेळेस दरोडेखोरांनी रस्त्यावर अडवून सशस्त्र थरार माजवत पंढरीच्या डॉक्टर कुटुंबीयांची सोन्यानाण्याच्या दागिन्यांची लाखो रुपयांची लूट केली असल्याची खळबळजनक घडली आहे.
सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर येरमाळा परिसरात नेहमीच अशी गुन्हेगारी फोफावलेली असते. यापूर्वीही असा घटना घडलेल्या आहेत. यावेळी पंढरपूर येथील लाड कुटुंबाला हा मोठा फटका बसला आहे. आपल्या कारने भारत गोविंदराव लाड, सुषमा भालचंद्र लाड, डॉ, सुनील सुरेश लाड, सायली सुनील लाड, चालक संभाजी पवार हे एका लग्नसोहळ्यासाठी अकोल्याला गेले होते तेथून परतताना त्यांच्या गाडीवर हा सशस्त्र दरोडा पडला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते पंढरपूरकडे येण्यास निघाले होते, रात्री साडे बारा वाजण्याच्या आसपास येडशी मार्गाने पंढरपूरकडे निघाले होते. धाराशिव सहकारी साखर कारखान्याच्या जवळ असलेल्या नाथवाडी पाटीजवळ त्यांची गाडी अडवून हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला.
रोडवर तुटलेल्या जॅकचा तुकडा टाकण्यात आला होता त्याचा जोरदार फाटा गाडीला बसला आणि चालकाशेजारी बसलेल्या डॉ. डॉ, सुनील लाड यांच्या पायाला लागला, या सर्व प्रकारामुळे कार वेडीवाकडी होऊ लागली. गाडी थांबवून खाली उतरून चालकाने पाहणी सुरु केली असता रस्त्याकडेच्या खड्ड्यातून चार लोक गाडीजवळ आले आणि 'काय झालं काका'? अशी विचारणाही करू लागले. डॉ. लाड याना संशय येताच त्यांनी लगेच गाडीत बसण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत एक दरोडेखोराने भालचंद्र लाड यांनी कॉलर पकडली आणि बाजूच्या खड्ड्यात ओढून नेले. बाकीच्यांनी चाकूसारख्या शास्त्रांचा महिलांना धाक दाखवत दागिने, रक्कम, मोबाईल देण्याची मागणी केली.
३१ ग्रॅम सोन्याचे दोन मंगळसूत्र, ३१ व १० ग्राम असे सोन्याचे दोन गंठण, हिरेजडित सोन्याच्या सात अंगठ्या, गळ्यातील सोन्याचे हार, सोन्याची साखळी, दोन राणी हार, सोन्याची कर्णफुले, सोनसाखळी यासह विद्युत साहित्त्य, इलेक्ट्रॉनिकल साहित्य मोबाईल आधी एकूण ७ लाख १२ हजार १०० रूपांचा ऐवज एकूण सहा दरोडेखारोनी लुटून नेला आहे. याप्रकरणी निखिल विजय लाड यांनी पोलिसात फिर्याद दिली असून येरमाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.