(आज होणार सर्व उमेदवारांची छाननी प्रक्रिया)
सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ५३८ ग्रामपंचायतींसाठी १७,५०८ विक्रमी उमेदवारी अर्ज राज्यासह सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीची कार्यक्रम जाहीर झाले असून यासाठी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता काल दिवसभरात जवळपास १७,५०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
जवळपास सोलापूर जिल्ह्यातील ५३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १७,५०८ विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे यावेळी उमेदवारी अर्ज भरताना जेष्ठांसह नव तरूणांनमध्ये सुद्धा मोठा उत्साह होता यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत जुन्या जानकारांचा अनुभव व नव तरूणांनची उर्जा विकास कामांसाठी कामी येणार असल्याचे दिसून येत आहे.
तालूका निहाय पुढील प्रमाणे :-
पंढरपूर:-७२ ग्रामपंचायतीसाठी ३,३३३ उमेदवारी अर्ज दाखल.
मंगळवेढा:-२३ ग्रामपंचायतीसाठी ९१० उमेदवारी अर्ज दाखल.
माढा:-८२ ग्रामपंचायतीसाठी २,३९७ उमेदवारी अर्ज दाखल.
मोहोळ:-७६ ग्रामपंचायतीसाठी २,१६६ उमेदवारी अर्ज दाखल.
करमाळा:- ५१ ग्रामपंचायतीसाठी १,४४७ उमेदवारी अर्ज दाखल.
माळशिरस:-४१ ग्रामपंचायतीसाठी १,८९१ उमेदवारी अर्ज दाखल.
सांगोला :- ६१ ग्रामपंचायतीसाठी २,५९६ उमेदवारी अर्ज दाखल.
अक्कलकोट :- ७२ ग्रामपंचायतीसाठी १,१९२ उमेदवारी अर्ज दाखल.
दक्षिण सोलापूर:- ५२ ग्रामपंचायतीसाठी १,५९६ उमेदवारी अर्ज दाखल.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.