सोलापुरात आजपासून कडक निर्बंध



सोलापूर // प्रतिनिधी 

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने पहाटेपर्यंत रंगणाऱ्या मेजवान्या, सोहळे, समारंभ यांतून करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडून ३१ डिसेंबरसाठीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. 


राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमावली जारी करत महानगरपालिकेने सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका यांवर बंदी घातली आहे, तर पोलिसांनीही शहरातील तसेच शहराच्या हद्दीवरील उपाहारगृहे, बार, ढाबे यांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

३१ डिसेंबर रोजी सायंकाळपासूनच शहरातील सर्व रस्त्यांवर पोलीस नाकाबंदी आणि गस्त असणार आहे.

दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागतानिमित्त रंगणाऱ्या पाटर्य़ा, मेजवान्या, सोहळे यांत नियमभंग होऊ नये, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, याकरिता पोलिसांची फौज तैनात करण्यात येते.

 मात्र, यंदा त्यासोबतच करोना फैलाव रोखण्यासाठीही पोलीस कडक पवित्रा घेणार आहेत. 

राज्य सरकारने रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणी ३१ डिसेंबरच्या रात्री करण्यात येणार आहे. 

त्यासाठी शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व रस्त्यावर पोलिसांची फौज नाकाबंदी तसेच गस्त घालणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget