पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या राजकीय पटलावरती अभिजीत पाटील यांची जोरदार चर्चा!

 



DVP उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष धाराशिव कारखान्याचे चेअरमन पंढरपूरचे उद्योगपती अभिजित धनंजय पाटील यांनी काल दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये भेट घेतली त्यानंतर संपूर्ण पंढरपूर तालुक्यातच नाही तर संपूर्ण सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा या भेटीबाबत सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली अभिजीत पाटील हे अत्यंत तरुण व होतकरू असे पंढरपूर येथील खूप मोठे उद्योजक आहेत त्यांनी अल्पावधीतच आपल्या या कार्याचा ठसा संपूर्ण सोलापूर उस्मानाबाद जिल्हा बरोबरच इतरही ठिकाणी उमटविला आहे त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखाना बरोबर नांदेड व नाशिक जिल्ह्यातील दोन कारखाने सद्यस्थितीला त्यांच्याकडे आहेत एका अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे येऊन पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण आज एवढ्या मोठ्या उद्योग-व्यवसाय पर्यंत पोहोचण्याचे कसब श्री अभिजीत पाटील यांच्याकडेच असल्याचे सर्व पंढरपूराकरातून बोलले जात आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार स्व.भारत नाना भालके यांच्या शोकसभेवेळी. अभिजित पाटील यांनी एका उदाहरणाचा आधार घेत "राजा का बेटा अभी राजा नही बनेगा जो होगा वही हक्कदार बनेगा"* *या भारतनानांच्या  असा वाक्य प्रचार केला होता त्यामुळे आगामी पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी श्री अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन मैदानात तर उतरणार नाहीत ना किंवा पुढील महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ते आपले पॅनल उभा करण्याच्या सुद्धा तयारीत असू शकतात अशा काही हालचाली DVP उद्योगसमूहाच्या गोटामध्ये सद्यस्थितीला सुरू आहेत. असे दिसत आहे.


 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मध्ये सद्यस्थितीला चेअरमन पदासाठी जी रस्सीखेच सुरू आहे. त्याबाबत सुद्धा पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ बरोबरच विठ्ठल कार्यक्षेत्रामध्ये जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे अभिजीत पाटील हे कारखान्याच्या बाबतीत फार सकारात्मक विचारसरणीचे असल्यामुळे ते विठ्ठल कारखान्यावर आपले पॅनल उभा करणार का आणि ते पॅनल त्यांनी उभा केले तर त्या पॅनमध्ये ते कोणाकोणाला समाविष्ट करणार व त्यांना विठ्ठल परिवाराचा सभासद आपल्या मतांचा कौल देणार का हे जरी प्रश्न असले तरीसुद्धा पंढरपूर तालुक्याच्या संपूर्ण राजकीय पटलावर ती सद्यस्थितीला अभिजीत धनंजय पाटील या नावाचे वलय निर्माण झाले असल्याचे दिसत आहे.



त्यांनी आपल्या साखर कारखान्याच्या व उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या कामाची चुणूक पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेला या अगोदर दाखवून दिली आहे. त्यामुळे संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील जो तरुणवर्ग आहे तो सद्यस्थितीला तरी श्री अभिजित धनंजय पाटील यांच्या मागे मोठ्या प्रमाणात उभा असल्याचे दिसत आहे व सर्व व युवक वर्गामध्ये अभिजीत पाटील यांची क्रेझ पाहायला मिळत आहे.


श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा एका स्वच्छ चारित्र्यसंपन्न व निष्ठावंत नेतृत्वाकडे जाऊन सर्व विठ्ठल परिवारातील व विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील सर्व सभासद वर्गाला न्याय मिळावा अशीच सर्व पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मतदार संघातील सर्व नागरिकांची इच्छा आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget