भारत बंद : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट राहणार बंद, माथाडी कामगारांचाही पाठिंबा




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट देखील सहभागी होणार आहे. एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे. सोबतत माथाडी कामगार देखील या बंदमध्ये सहभागी होतील. 

   एपीएमसी दाणा मार्केट आणि मसाला मार्केट बंद राहणार का याबाबत उद्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. एपीएमसी संचालक शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एपीएमसीतील तीन मार्केट राहणार बंद राहणार आहेत. शेतकरी कायद्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली होती. त्यामुळे आता एपीएमसीदेखील बंद राहणार आहे.

   नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता ९ डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. शेतकरी संघटना कायदा रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण केंद्र सरकार कायदा रद्द करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

    शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या 'भारत बंद'ला आतापर्यंत अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच विरोधी पक्ष देखील यातून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीने या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

Tags

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget