पंढरपूर // प्रतिनिधी
बुरुड समाजाचे आराध्यदैवत महातपस्वी श्री.संत केतय्या स्वामी यांची जयंती आज खादी ग्रामोद्योग परिसरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडली.
सदर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार मा. प्रशांतराव परिचारक तर प्रमुख पाहुणे पंढरपूर म्हणून नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. अनिल अभंगराव सर, अधिकारी श्री. सुनील वाळुजकर, समाजसेवक धर्मराज आदी मान्यवरांचे उपस्थितीत होते. याप्रसंगी लक्ष्मण पापरकर, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक राजू सर्वगोड, इब्राहिम बोहरी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून श्री.संत केतय्या स्वामींना अभिवादन केले.
यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक म्हणाले, बुरुड समाज यांनी युवक व महिलांनी पुढे येऊन बांबू कला प्रशिक्षण व शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करावे, यासाठी लागणारी सर्वतोपरी सहकार्य माझे वतीने केले जाईल. तसेच समाजातील गरजू कुटुंबियांना घरकुल अंतर्गत घर व समाजासाठी समाज मंदिर उभे करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. जयंतीचे औचित्य साधून बुरुड समाजाचे वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील अनेक बांधवांना तसेच महिलांनाही रक्तदान उस्फुर्दपणे भाग घेताला. तुसे यावेळी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते.
बुरूड समाजाचे वतीने यावेळी माझी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक, आमदार स्व. भारतनाना भालके, भागवताचार्य स्व.वा.ना. उत्पात, स्व. रामदास महाराज कैकाडी, स्व. राजूबापू पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणेत आली.
या प्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे, नामदेव साळुंखे, बाळासो साळुंखे, किरण सुरवसे, विष्णू सुरवसे, मोहन सुरवसे, कुमार सुरवसे, दिलीप सुरवसे, राजाभाऊ सूर्यवंशी, वसंत सुरवसे, प्रदीप साळुंखे, लखन साळुंखे, मुजोर साळुंखे, मंगेश सुरवसे, विजय सुरवसे, संभाजी कुकडे, सुरज सूरवसे आधी समाज बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.