केंद्रातील मोदी सरकार सातत्याने करत असलेल्या गॅस, पेट्रोल, डिझेल चे दरवाढीचा निषेध करुण दरवाढ मागे घेण्याची युवक काँग्रेसने मागणी आहे.
सोलापूर // प्रतिनिधी
केन्द्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याची टिका केन्द्रीय राज्य मंत्री तसेच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतीच केली. यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचा संताप अनावर झाला असुन या वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर शहर युवक काँग्रेच्या वतीने सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सेवादल प्रदेश पदाधिकारी अशोक कलशेट्टी, उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, राहुल गोयल, संतोष अट्टेलुर, विवेक इंगळे, अभिषेक गायकवाड़, शाहु सलगर, सुभाष वाघमारे, किरण राठोड, धम्मा जगझाप, जावेद कुरेशी, आनंद भंडारे, शिव कोरे, अनवर शेख, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सोलापूर पूनम गेट येथे *केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून नरेंद्र मोदी आणि राबसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करत पुतळा दहन करुण निषेध व्यक्त केला.*
यावेळी बोलताना सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की भाजपाचे मोदी सरकार कुठलाही गंभीर विषय समोर आला की बुध्दीभेद करतांना दिसून येते. वेगवेगळया विषयांत गुंतवून नागरीकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपाचे मोदी सरकार करीत आहे. आता तर शेतकरी विरोधी काळया कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दिल्लीत आणि देशभरात लाखो शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चिनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले असून हे सर्व लज्जास्पद आहे. रावसाहेब दानवे हे नेहमीच शेतकरी विरोधी वक्तव्य करीत असतात. मागेही त्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून शिवीगाळ केली होती. आता शेतकरी आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान आहे असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. त्याचा मी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करतो. अन्नदाता शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवे नी माफी मागावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शेतकाऱ्यांविषयी संवेदना असतील तर त्यांनी त्वरित रावसाहेब दानवे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
यावेळी बोलताना नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाच्या पाठिमागे चीन व पाकिस्तानचा हात आहे असे म्हणणाऱ्या रावसाहेव दानवेचे नेते नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात बिर्यानी खायला गेले होते. पाकिस्तानातून साखर व कांदा आयात केले होते. शेतकरी आंदोलनावरुन लक्ष विचलित करण्यासाठी बेताल वक्तव्य करत आहेत याचा निषेध करतो. तसेच मोदी सरकार सातत्याने गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ करत असुन या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असुन या दरवाढीचा निषेध करतो आणि केंद्रातील मोदी सरकारने तात्काळ गॅस, पैट्रोल, डिझेल दरवाढ मागे घ्यावे अशीही मागणी केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.