वृत्तसंस्था // प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू व धर्मवीर संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहु महाराज यांची २७१ वि पुण्यतिथी सातारा येथील संगम माहुली येथे साजरी करण्यात आली. त्यांच्या समाधीची दुरावस्था झाली होती. पुण्यतिथीचे अौचित्य साधुन लोकसहभागातून व राजेघराण्याकडुन तिचा जिर्णोद्धार करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी शिवसेना सातारा जिल्हा, कराड तालुक्याच्या वतिने शिवसेना उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी नविन समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. छत्रपती शाहु महाराज यांचा पराक्रम हा दैदिप्यमान होता तो जगासमोर येण्यासाठी त्यांच्यावर मालिका किंवा चित्रपट काढावा तसेच पुरातत्त्व विभागाने जाचक अटी न लावता महाराष्ट्रातील इतरही महापुरुषांच्या दुर्लक्षित समाध्याचे पुनर्जीवन करावे अशी मागणीही काकासाहेब जाधव यांनी यावेळी केली.
यावेळी विभाग प्रमुख प्रविण लोहार , निलेश पारखे, अक्षय मसके , गणेश जाधव , भार्गव शिंदे तसेच शिवप्रेमी व शिवसैनिक उपस्थित होते


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.