आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते सोलापूर महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांच्या कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव



सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना संसर्गाच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असताना सोलापूर महापालिका परिवहन विभागाचे कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत परिवहन विभाग कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, बाळे चेक पोस्ट कर्मचारी, कोरोनटाईन पेशंट, भोजन व पाणी वाटप, आशा वर्कर, अंगनवाड़ी सेविका, संशयित रुग्ण यांना ने आण करण्याचे काम केले होते व आजही करत आहेत आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रेरणेतून सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे यांच्या वतीने परिवहन कर्मचाऱ्यांचा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते  सोमपा गटनेते चेतन नरोटे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्यालयीन अधीक्षक श्रीशैल लिगाड़े, वर्कशॉप मैनेजर मल्लिकार्जुन पडग्यानुर यांच्या प्रमुख उपस्थितीत "कोरोना योद्धा" सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


यावेळी कोरोना संकटकाळात कर्मचारयांनी चांगल्या प्रकारे काम केले असुन परिवहन कर्मचारयांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दिले.

या कार्यक्रमासाठी सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget