शिवसेनेला धक्का, शिवबंधन तोडून बाळासाहेब सानप भाजपमध्ये दाखल




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिवबंधन तोडून अखेर माजी आमदार बाळासाहेब सानप(Balasaheb Sanap)  यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. मुंबईत भाजपचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  मुंबईतील नरमीन पाँईट येथील भाजपच्या मुख्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सानप हे आधीपासूनच भाजपमध्ये होते. ते फक्त आपल्यापासून काही काळ दूर गेले होते. पण, आता ते परत आले आहे.  बाळासाहेब कुठल्याही जबाबदारी पेलू शकतात.  त्यांना योग्य जबाबदारी दिली जाईल. सानप यांच्या येण्यामुळे पक्ष मजबूत होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.तसंच, 'भाजपात आणखी काही जणांचा प्रवेश होणार आहे. काही चांगल्या लोकांना पक्षात घेणार असून योग्य ती जबाबदारी देण्यात येणार आहे.  महा विकासआघाडीचे अनेक आमदार नाराज, त्यांनाच भाजपात यायचं आहे. तीन पक्षांनी एकत्र यावेत, यामुळे राजकारणात मोठी जागा मोकळी होईल. ती आम्ही काबीज करू' असंही फडणवीस म्हणाले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget