काटी या गावात गळ्याला कोयता लावून रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंची चोरी




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

दि.२१ डिसेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील काटी गावातील एका कुटुंबावर सहा अज्ञातांनी रात्री एक वाजन्याच्या सुमारास दरोडा टाकत ४० हजार रोख रक्कम, २३ हजार रूपये किमतीचे मंणीमगळसुत्र, १९,०००/- रू किमतीचे लहान गंठन,३ हजार किमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान बदाम,९ हजार किमतीची ३ ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची फुले,चांदीची साखळी,सोन्याची नाकातील चमकी,चांदीची जोडवी व ६ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि ४ हजार रुपये किमतीचा रेड मी कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ७ हजार १००/- रूपयाच्या मुद्देमालावर हात साफ केले आहेत.या प्रकरणी रत्नमाला सिताराम खरात वय ६० वर्षे धंदा घरकाम रा.काटी ता.इंदापुर जि पुणे यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात ६ इसमांविरुध्द भा.द.वी.कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि.२१ डिसेंबर रोजी रात्री एक वाजताचे सुमारास मौजे काटी ता.इंदापुर जि पुणे गावचे हद्दीत फिर्यादी व त्यांचे पती व नात असे घरामध्ये झोपले होते. सदर खोलीचे दरवाज्यावर त्यांच्या घराजवळचा मोठा दगड मारून दरवाज्या तोडुन सहा अनोळखी इसमांनी खोलीत प्रवेश केला. त्या अनोळखी इसमांपैकी एका इसमाचे हातातील लोखंडी कोयता नात श्रावणी हिचे गळयाला लावून घरातील सोन्याचे दागिने व पैसे ताबोडतोब काढुन द्या नाही तर मुलीला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget