अन्नछत्र मंडळ वतीने यशवंत पवार यांचा सत्कार



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पत्रकारांच्या गाठी भेटीसाठी अक्कलकोट येथे आले असता श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते यशवंत पवार यांचा शाल श्रीफळ व स्वामींची प्रतिमा देऊन अन्नछत्र मंडळाच्यावतीने यथोचितसत्कार करण्यात आला.तत्पूर्वी श्री.स्वामी समर्थांचा प्रसाद ग्रहण करित समाधान व्यक्त केले.

*स्वामींच्या दर्शनाने मनशांती लाभली*

प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. स्वामींच्या दर्शनाने मनशांती लाभली, आपण धन्य धन्य झालो असून स्वामींच्या दर्शनाने खूपच समाधान वाटते अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अभिजित पतकी, दै. सुराज्यचे पत्रकार विश्वनाथ चव्हाण, अक्षय बबलाद, संमोहन तज्ञ डॉ रवींद्र सोरटे आदी पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget