नो मराठा आरक्षण तर नो ग्रामपंचायती इलेक्शन शिवस्वराज्य युवा संघटनेचे संदिप मुटकुळे




पंढरपूर // प्रतिनिधी 

मराठा सामाजाचा गेल्या अनेक दिवसांपासून रँगाळलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न तसेच शेतकरी विरोधी कृषी कायद्यात सुधारणा करण्यासाठी जनतेने नो आरक्षण नो इलेक्शन अशी ठाम भूमिका घातल्यास नक्कीच हे महाविकास आघाडी सरकार खडबडून जागे होईल,असा विश्वास शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे समवयस्क संदिप मुटकुळे यांनी व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी अनेक मराठा तरूण शहीद झाले आहेत. अनेकांनी आंदोलने उपोषण करून याप्रश्नी सरकाराचे लक्ष वेधले आहे.कधी आरक्षण मंजूर तर कधी स्थगिती,अशा राजकीय खेळात मराठा आरक्षण रखडले जात आहे.याशिवाय केंद्राच्या कृषी कायद्यातून शेतक-यांवर गुलामगिरीची वेळ येणार आहे.हा कायदा पास झाला तर शेतकरी आणि कष्टकरी मजुरांवर वाईट दिवस वेळ येणार आहे.त्यामुळे आतातरी जागे होण्याची गरज आहे.आज सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधून सुरू झाली आहे.अशावेळी जनतेने व मराठा आरक्षण आणि कृषी कायद्यात सुधारणा करेपर्यंत निवडणुकांवर गावागावातून बहिष्काराचे ठरावा करावे असे आव्हान शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वय संदिप मुटकुळे यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget