वृत्तसंस्था // प्रतिनिधी
उपरोक्त महत्वपूर्ण विषयाचा तक्रारी अर्ज आम्ही दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी आपणाकडे दिला होता, शिवाय वरिष्ठ कार्यालयाकडे आणि मंत्रालय पातळीपर्यंत याच निवेदनाच्या प्रति सादर केल्या होत्या.सदर तक्रारी अर्ज सादर करून दोन महिने पूर्ण झाले आहेत परंतु आपणांकडून आम्हास काहीही कळविण्यात आले नाही.अथवा सदर अधिकाऱ्यांची चौकशी अथवा कारवाई केल्याचे काहीच आढळले नाही,त्यावरून आपण आमच्या महत्वाच्या आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारीची कसलीही दखल न घेता अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे.सदर अधिकारी मुख्यालयात राहत नसताना ते घरभाडे घेऊन शासनाची फसवणूक करतात हे देखील आपल्या निदर्शनास आणण्यात आले होते तसेच अन्य प्रकारच्या गैरकृत्याची चोकशी करण्याची मागणी केली होती.सदर दोन महिन्यात आमच्या संदर्भीय निवेदनाची दखल घेवून (अर्जावर) काय कारवाई अथवा कार्यवाही केली आहे.याची माहिती आम्हास येत्या आठ दिवसात कारवाई करावी.आपण या निवेदनाची दखल न घेतल्यास शिवस्वराज्य युवा संघटना आपल्या भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर या कार्यालयासमोर उपोषण,करणार अशा विविध प्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन करील याची पूर्वसूचना याद्वारे देत आहोत.यावेळी निवेदन घेताना उपअभियंता ज्योती इंगवले यांच्याकडे निवेदन देताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुमित शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख तानाजी मोरे,राष्ट्रवादी युवक शहरउपाध्यक्ष दादा थिटे,आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर कदम,इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.