मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आळंदी वारीचा निर्णय घेण्यात येईल:- नानासाहेब पटोले




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

प्रथम पंढरपूर व आळंदी देवस्थानची पाहणी करणार आहे. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून व प्रमुख महाराज मंडळींशी चर्चा करून आळंदी येथील यात्रेबाबत निर्णय कळवू. असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.     विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे व संत चोखामेळा महाराजांचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पुढे पटोले म्हणाले, पंढरपूर हे राज्याचे गौरव स्थान आहे. वारकरी ही संस्कृती आहे. पंढरपूर  देवस्थान, विकास व व्यवस्थेचे भविष्यात काही नुकसान होणार नाही. त्या संदर्भात विधान भवनात बैठक लावणार आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मंदिर समितीचे अधिकारी वारकरी व अन्य मंडळी उपस्थित राहतील असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget