ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून लातूरकररांना अनोखी भेट
आरोग्य, शैक्षणिक क्षेत्राला मिळणार चालना
संपूर्ण देशात शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत असलेल्या लातूर येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय केंद्र मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला घेतला आहे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यातून हे विभागीय केंद्र मंजूर झाल्याने लातूरच्या एकूण वैभवात भर पडणार आहे.
'जे जे नवं ते ते लातूर' ला हवं असा ध्यास असलेल्या लातूकरांमुळे या शहराचा आणि जिल्ह्याचा अत्यंत गतिमान पद्धतीने विकास झाला आहे. विकासाची ही प्रक्रिया कायम सुरू आहे, मागच्या काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी लातूरचा लोकप्रतिनिधी या नात्याने या शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी कोणत्याही मागणीची वाट न पाहता अनेक योजना राबवल्या यातून येथील विकास प्रक्रियेने मोठी गती मिळालेली आहे.
लातूर येथील पालक, शिक्षक, संस्थाचालक, विद्यार्थी यांची जिद्द आणि त्यातून निर्माण झालेले शैक्षणिक वातावरण लक्षात घेऊन येथे असंख्य शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. त्यातून शिक्षण क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण होऊन लातूरचा आदर्शवंत शैक्षणिक पॅटर्न निर्माण झाला, सातत्यपूर्ण शैक्षणिक यशामुळे लातूर हे एक शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. हे शैक्षणिककेंद्र प्रस्थापित होण्यासाठी शाळा महाविद्यालया बरोबरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्चमाध्यमिक मंडळ विभागीय कार्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर येथे सुरू करण्यात आले, त्या काळात फक्त शैक्षणिक सुविधांचीच विभागीय कार्यालये लातूरला आली असे नव्हे तर कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, परिवहन, सहकार, धर्मादाय, जलसंपदा यासह २५ ते ३० खात्याची विभागीय कार्यालये लातूरला येऊन लातूरची सर्वांगीण प्रगती होत राहिली आहे.
आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते ज्या ज्या खात्याचे मंत्री राहिले त्या प्रत्येक खात्याच्या योजनांचा पहिला घास लातूरला मिळाला, शिवाय या प्रत्येक खात्याचे विभागीय कार्यालय लातूरला सूरू झाले.
विद्यमान पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून वैद्यकीय शिक्षण या खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनीही लगेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकेंद्र मंजुर केले आहे. नाशिक येथे सदरील विद्यापीठ सुरू झाल्यानंतर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व कोल्हापूर या ५ ठिकाणी विभागीय केंद्र स्थापन करण्यात आली होती. यातील औरंगाबाद विभागीय केंद्राचे विभाजन करून आत्ता आणखी एक विभागीय कार्यालय केंद्र लातूर येथे स्थापन करण्यात आले आहे. या विभागीय केंद्रामुळे लातूरच्या वैभवात भर पडणार असून लातूरच्या शैक्षणिक विकासासाठी आणखीन गती मिळणार आहे. लातूर साठी हे विभागीय केंद्र मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे ना. अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.