कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण नाईट लँडिंग, भूसंपादन, व मुंबईसह इतर प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यास संदर्भातील प्रश्नांवर वैयक्तिक रित्या लक्ष देऊन सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री ,नामदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर विमानतळ भेटीप्रसंगी केली .कोल्हापूर विमानतळावरील सुरू असलेल्या विकास कामांचा विस्तृत आढावा यावेळी त्यांनी घेऊन विमानतळावरील अडचणी संदर्भात माहिती घेतली. तसेच विमानतळावरून विविध शहरांना सुरू असलेल्या विमानसेवेची माहिती प्रवाशांचा प्रतिसाद या संदर्भात ही चर्चा केली व विमानतळावरील सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी ही नामदार चव्हाण यांनी यावेळी केली.
यावेळी विमानतळावरील महत्त्वपूर्ण विकास कामांची माहिती कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारिया यांनी त्यांना दिली. यावेळी संजय डी पाटील ,महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.