पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar 80th Birthday) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm Narendra Modi) यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे.  शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.दरम्यान, गेली पाच दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार राजकारणाचं विद्यापीठ म्हणून देशात ओळखले जातात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव प्रतिष्ठान केंद्रात विशेष आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये अशी विनंती पवार कुटुंबाकडून करण्यात आली आहे.शरद पवार यांच्या वाढदिवसाला ऑनलाइन शुभेच्छा देण्याची व्यवस्था यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शरद पवार शिल्पकार आहेत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचेही दिग्गज नेते आणि मंत्री येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget