फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या ११० विद्यार्थ्यांची डेल या नामांकित कंपनीमध्ये निवड



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसकॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मधील ११० विद्यार्थ्यांची  डेल या नामांकित कंपनीमध्ये निवड  झाली असल्याची   माहिती संस्थेचे चेअरमन  मॅनेजिंग डायरेक्टर श्रीभाऊसाहेब रुपनर यांनी दिलीयावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्रीदिनेश रुपनरकॅम्पस डायरेक्टर श्रीसंजय अदाटेमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉआर. बीशेंडगे   ट्रेनिंग  प्लेसमेंट अधिकारी डॉसाहेबगौडा उपस्थित होते.

    हा कार्यक्रम डॉबबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे  डेल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. तीन राज्यातील (दिल्ली,महाराष्ट्र  ओडिसासर्व इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थी ऑनलाईन मुलाखतीसाठी सहभागी झाली होतीहा कार्यक्रम इंजिनिअरिंग कॉलेजमधील सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मागील  महिन्यांपासून ऑनलाईन पद्धतीने दोन सत्रामध्ये घेण्यात आला.त्यातील पहिल्या सत्रामध्ये ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांची पुढील ऑनलाईन ट्रेनिंगसाठी निवड करण्यात आली.

     यामध्ये फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलेजच्या ११० विद्यार्थ्यांना पुढील दोन ते तीन महिन्यांपर्यंत  मोफत ऑनलाईन ट्रेनिंग देण्यात येणार आहेयामध्ये सध्याच्या  करिअरसाठी  आवश्यक अशा डिजिटल मार्केटिंगवेब डेव्हलपमेंट ,मशीन लर्निंगचा यामध्ये समावेश आहेहे सर्व ट्रेनिंग डेल कंपनी ऑनलाईन पद्धतीने दररोज एक ते दोन तास  कोर्से वर्क घेत आहे. यामध्ये ट्रेनिंग संपल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सर्टिफिकेट देऊन पुढे त्यांना त्याच कंपनीत जॉब मिळवून दिला जातो.

    डॉबबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी  डेल कंपनी  ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत, गरीब विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग देऊन समाजातील वंचित  उपेक्षित घटकांना सामावून घेण्याचे महान कार्य केल्याबद्दल महाविद्यालयातर्फे ट्रेनिंग  प्लेसमेंट अधिकारी डॉसाहेबगौडा संगनगौडर यांनी विद्यापीठाचे  डेल कंपनीचे आभार मानलेयासाठी अकॅडमिक डीन प्राटीएन.जगतापसर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटरसर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांचे सहकार्य  लाभले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget