सोलापूर // प्रतिनिधी
येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी राज्य सामायिक प्रवेश कक्ष, मुंबई यांनी बारावी शास्त्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष बी फार्मसी व डी फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया (कॅप) दिनांक ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२० पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी दिली. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर व फॅबटेक टेक्निकल कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे उपस्थित होते.
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क,सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात प्रवेश अर्जाचे कन्फर्मशन, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे.
प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रा. श्रीनिवास माने मोबा. न.९५११२५२२८५ व प्रा. एस एम काझी मोबा. न. ९०९६०८४२२८ यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.