(उद्योगपती अभिजित पाटील यांनी दिली रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट)
सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर येथील वीरमर्द अनिलराज डोंबे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या रक्तदान शिबिरास DVP उद्योग समूहाचे उद्योगपती श्री अभिजित धनंजय पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
हा कार्यक्रम पंढरपूर येथील बसवेश्वर चौक खंडोबा डोंबे गल्ली पंढरपूर येथे संपन्न झाला या सर्व रक्तदान शिबिरास सर्व रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रक्ताचा पुरवठा कमी होत असल्या कारणामुळे सर्वत्र रक्तदान शिबिरे चांगल्या पद्धतीने होत आहेत व याच अनुषंगाने आज पंढरपूर येथील वीरमर्द अनिल डोंबे यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अनिलराज तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळीDVP उद्योग समूहाचे उद्योगपती श्री अभिजीत पाटील, नगरसेवक निलराज डोंबे,अमित डोंबे,सागर यादव,आशिष डोंबे, श्याम गोगाव सर, नगरसेवक विक्रम शिरसट, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, अंबादास धोत्रे, शिवाजी आप्पा कोळी, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, बंडू खटावकर ऋषिकेश बडवे,अमोल आटकळे, अॅड. रामलिंग कोष्टी, सुरज पावले, बापू गांडूळे व वीरमर्द अनिलराज डोंबे मित्र मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.