सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार
सोलापूर प्रतिनिधी :- पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार प्राध्यापक जयंत आसगावर यांचा सत्कार सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार विश्वनाथ चाकोते व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे करण्यात आला.प्रथम पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस केशव इंगळे व पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते हाजीमलंग नदाफ व पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष उपेंद्र ठाकर यांनी मनोगत व्यक्त करून अभिनंदन करुण शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना जयंत आसगावकर म्हणाले की माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले व पदाधिकारी कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, शिक्षक मतदार, विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी या सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळे माझा विजय झाला म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू असे विचार यावेळी व्यक्त केला.यावेळी नगरसेविका अनुराधा काटकर यांची सोलापूर महानगर पालिका स्थापत्य समिती सभापती पदी निवड झाल्याबद्दल आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, कार्याध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे सर्व प्रतिनिधी, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, माजी महापौर, नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे सर्व उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, प्रवक्ते, पालिकेचे सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेविका जगदेवी नवले यांनी केले. आभार प्रर्दशन महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर यांनी मानले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.