वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पुर्वी च्या काळात गावा गावात पहाटे मंदिरातील घंटा ची आवाज ऐकू यायचं नंतर मंदिरामध्ये भक्ती गीत गाण लावायचे तसेच कोंबडी कु....कु..म्हणून आवाज दिला की पहट झाला असे लोक समजायचे, सध्याच्या काळात घड्याळ, मोबाईल वर आम्ही अलार्म ठेवतो सकाळी लवकर उठण्यासाठी,पण हल्लीच्या घाई गडबडीत राञी उशीरा झोपतो किंवा झोप लवकर लागत नाही त्यामुळे सकाळी अलार्म ठेवला तरी आपण बंद करून पुन्हा झोपी जातो ,काही लोकं ध्यान करीत असतात ,मंञ जाप करत असतात पण दुधनी नगरपरिषदेचे घंटा गाडी ला आपला कारण काय समजणार ? तसेच संध्याकाळी पाच वाजले की पुन्हा तेच आवाज " गाडीवाला आया घर से कचरा निकाल " अहो अक्षरशः मुलांना राष्ट्रगीत येत नाही पण घंटा गाडीचा सर्व गाणे येतात, संध्याकाळी जेव्हा गाडी येते तेव्हा कुठला तरी डाॅक्टर पेशंटला महत्वाचे काही तरी सांगत असतो, एखादी व्यक्ती फोन वर बोलत असतो, शिक्षक मुलांना शिकवत असतो असे काही ना काही गोष्टी घडत असतात तेव्हा दुधनीकरांना घंटा गाडीचा आवाज सहन करावा लागतो.
सरकारनं डाॅल्बी, पारंपारिक वाद्य , मंदिरातील पहाटेच्या भक्ती गीत, मशीद मधील अजान, गाडीचा हाॅर्न, शाळेतील घंटा इत्यादी अनेक आवाजावर सरकारने आवाजाची मर्यादा ठेवली, पण दुधनी नगरपरिषदेचे घंटा गाडी चा आवाजा डाॅल्बी पेक्षा कमी नाही,तरा दुधनी नगरपरिषदेचे घंटा गाडी ला आवाजाची मर्यादा नाही का?असे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. माञ सत्ते पुढे शहाणपणा चालत नाही, आणि सरकारच काम सहा महिने थांब ह्या गोष्टीचा दुधनी शहरातील लोक वापर करीत घंटा गाडीचा आवाज सहन करत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.