तुम्ही जीवनात संसार हीन असलात तरी चालेल पण "संस्कार"हीन बनु नका :ह.भ.प.श्री.गजानन महाराज हिरुळकर



(पहिले किर्तनरुपी वाकपुष्प)


 लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रीघा या शरण पांडुरंगा ।। यज्ञ

स्व. रामकृष्ण उर्फ गजाननराव गणुजी शेटे यांचे शुद्ध क्रिये निमित्त गरुड पुराण व ज्ञानेश्वरी पारायण तथा हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे नियोजन आमचे परम स्नेही ह.भ.प. गणेश महाराज शेटे यानी केले आहे . आणि या मुक्ती सप्ताहात आज मला प्रथम दिनी पुष्प भावांजली अर्पण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.  एकांतात बसून मन शांत करून आपल्या गत आयुष्याचे सिंहावलोकन करून स्वताच्या मनाला विचारा की आजपर्यंत आपण भोग भोगले की आपल्याला भोगांनी भोगले ?  

 राजा भर्तृहरीने संसारात अनेक थपडा खाल्ल्यानंतर आपल्या अनुभव शब्दांकित केला.... भोगा न भुक्ता, वयमेव भुक्ता ।तपो न तप्तं वयमेव तप्ता ।।कालो न यात: वयमेव याता: ।तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा ।।

आम्ही भोग भोगले अश्या भ्रमात आपण असतो . मात्र आपणच भोगाकडुन भोगल्या जातो . माणसाला वाटते आपण मौजमजेत काळ संपवला पण काळच आपले ग्रसन करीत असतो कालचक्र सतत फिरत असते, ते कधी बंद पडत नाही. सत्ययुगा नंतर ,, त्रैता , द्वापार,, कलीयुग नंतर पुन्हा सत्य,, त्रैता ... हे राहाटी सुरूच राहणार. काळ संपत नाही पण आयुष्यातील पळ , घटकां आपल्याला संपवीत असतात

मरेपर्यंत तृष्णा( ईच्छा, वासना ) जीर्ण होत नाहीत पण आपण क्षणाक्षणाला जीर्ण- म्हातारे  होत असतो  व पुढे मृत्यू अटळ आहेच . मात्र जन्म आणि मरणाच्या मधला कालावधी  ज्यां संगतीत संस्कारात गेला त्यानुसार मनुष्याला गती प्राप्त होते.  तुम्ही जीवनात संसार हीन असलात तरी चालेल पण संस्कार हीन बनु नका ...!!स्व. रामकृष्णजी शेटे यांनी त्यांच्या मुलांना सुसंस्कारित घडविले म्हणून आज ह्या धर्म मंडपात त्यांनी जगाचा निरोप जरी घेतला असेल तरीही त्यांच्या नावाने त्यांच्या शुद्ध क्रिये निमीत्त अखंड हरिनामाचा गजर होतो आहे.


ह.भ.प.गजाननजी महाराज हिरुळकर( गजुदास ) 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget