दामाजी कारखान्याची निवडणुक डोळयासमोर ठेवुन दिशाभुल करण्याचा असंतुष्ट मंडळीचा अयशस्वी प्रयत्न:- श्री लक्ष्मण जगताप, संचालक




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकÅयांची अडचण लक्षात घेवुन स्व।किसनलाल रामचंद्र मर्दा ऊफ मारवाडी वकिलसाहेब व स्व।रतनचंद शिवलाल शहा शेठजी या दोघानी एकत्र येवुन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची उभारणी काटकसरीने केली असलेचे मंगळवेढा तालुक्यातील संपुर्ण जनतेला माहित आहे।

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अर्थिक परिस्थिती चांगली असुन आमचे संचालक मंडळ सत्तेवर आलेपासुन  अडचणी व दुष्काळी परिस्थितीवर मात करुन कारखान्याचे चार गळीत हंगाम पार पाडले आहेत। सध्या पांचवा गळीत हंगाम सुरु असुन ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांची मागील सर्व हंगामातील ऊसाची बिले या संचालक मंडळाने शासनाचे नियमानुसार(एफ।आर।पी।) अदा केलेली आहेत। कारखान्याची निवडणुक डोळयासमोर ठेवुन सभासदांची दिशाभुल करणेचा खटाटोप कांही असंतुष्ट मंडळी करित आहेत। याकडे ऊस उत्पादक सभासद शेतकÅयांनी लक्ष देवु नये असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक श्री।लक्ष्मण जगताप यांनी केले आहे।  

कारखान्याच्या परिस्थितीबाबत माहिती देताना श्री जगताप म्हणाले कि। सध्या कारखान्याचा सिझन उत्तम प्रकारे सुरु असुन दररोज ३६०० ते ३८०० मे। टन गाळप होत आहे। चेअरमन श्री समाधान आवताडे यांचे संचालक मंडळाचे योग्य नियोजन, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी , तोडणीवाहतुक ठेकेदार व कर्मचाÅयांचे चांगले सहकार्य असल्याने कारखान्याने २६ दिवसात कारखान्याचे एक लाख गाळप झाले आहे। कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणात ऊस असलेने कारखाना उत्तम प्रकारे चालवुन चांगल्या रिकव्हरीने जास्तीत जास्त गाळप करणेसाठी संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे। असे असताना कांही विघ्नसंतोषी मंडळीकडुन सभासद व कामगारांमध्ये असंतोष माजविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु आहे। त्यास तालुक्यातील सभासद व कामगार भिक घालणार नाहीत याची संबंधीतांनी नोंद घ्यावी।  कारखान्याचे चेअरमन श्री। समाधान आवताडे हे स्वतः मोठे उद्योजक आहेत। त्यांनी मागील संचालक मंडळात काम करत असताना कारखाना चालविणेसाठी आवश्यक बाबींचा बारकाईने अभयास केला आहे। श्री समाधान आवताडे हे मागील पंचवार्षिकचे संचालक मंडळाचे मिटींगमध्ये अभयासपुवर्क बोलुन, कारखान्याचा फायदा तोटा पटवुन देत होते। कारखान्याच्या हिताच्या विरोधात तत्कालीन संचालक मंडळाचे कामकाज होत असल्याचे लक्षात आलेनंतर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकÅयांचे हितासाठी त्यांनी स्वतंत्र पùनल करुन निवडणुक लढवुन सत्ता मिळविली आहे। कारखाना चालविणेसाठी चेअरमन श्री समाधान आवताडे व त्यांचे संचालक मंडळ खंबीर असुन अशा खोडसाळपणाने दिलेल्या बातम्यावर ऊस उत्पादक सभासद शेतकÅयांनी विश्वास ठेवु नये असे श्री लक्ष्मण जगताप म्हणाले।

कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ फेब्रुवारी २०१६ मध्ये सत्तेत आलेले असताना कारखान्यावर ५७।४७ कोटी कर्ज होते। त्यापैकी विद्यमान संचालक मंडळाने ३४।९९ कोटी एवढया कर्जाची परतफेड केली आहे।  या संचालक मंडळाचे काळात सध्या कारखान्यावर आजअखेर एकुण ७३।१५ कोटी कर्ज आहे।  मागील चार हंगामापेक्षा चालु गळीत हंगामात जास्तीचे म्हणजे ५।५० लाख मे।टन गाळप होवुन कर्जाची परतफेड होणेस मदत होणार आहे।

असंतुष्ट मंडळीच्या पतसंस्थेने तोडणी वाहतुक यंत्रणेला दिलेल्या कर्जापोटी २।२५ कोटी रक्कम नुतनीकरण करणेचे अटीवर भरुन घेतली व तसे न करता भागातील ऊस तोडणी ठेकेदारांवर कलम १३८ अन्वये केसेस दाखल करुन तालुक्यातील ट्रùक्टर मालकांना दुष्काळी परिस्थितीत नाहक त्रास दिला। शेतकरी संघटनेचे नेत्रत्व करित असताना संस्थापक-चेअरमन स्व।किसनलाल मर्दा ऊर्फ मारवाडी वकिलसाहेब यांना दिलेला त्रास मंगळवेढा तालुक्यातील जनता विसरलेली नाही याची जाणीव ठेवा। तदनंतर लगेच पदाच्या राजकिय लालसेपोटी स्व।चरणुकाका पाटीलसाहेब यांचे नेतृत्वाखाली संचालक म्हणुन  पाच वर्षे कारभारी म्हणुन काम करताना आपण शेतकरी संघटना वाÅयावर सोडली। आपली राजकिय पोळी भाजणेसाठी शेतकरी संघटनेचा वापर आपण शिडीसारखा करुन घेतलेचे मंगळवेढा तालुक्यातील जनता नेहमीच चर्चा करित असते। या सर्व बाबींचा आपण अंर्तमुख होवुन विचार करावा असे श्री।लक्ष्मण जगताप शेवटी म्हणाले।

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget