सोलापूर // प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डीसले याना सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी बार्शी येथे जाऊन गौरव केला यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, हरिभाऊ जाधव गुरुजी उपस्थित होते,
डीसले याना मिळालेलं यश सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे दिलिप धोत्रे यांनी सांगितले,
डीसले याना पुरस्कार जाहीर झाला हा महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आहे, शिक्षक हे केवळ शिक्षण देत नाहीत तर चांगली मूल्ये देऊन आपल्या विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवण्यात मोठा वाटा उचलतात, सध्या डिजीटल शिक्षणाचे महत्व वाढत असताना या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या रणजितसिंह डीसले यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाण ही बाब अतिशय मानाची आहे,
विद्यार्थ्याच्या भविश्याविषयी त्यांना वाटणारी तळमळ त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत आहे,,
विशेष म्हणजे पुरुस्कार च्या रकमेतील काही रकमेचा विनियोग त्यांनी नऊ देशातील विद्यार्थ्यांना उत्तम गुण वत्तेचे शिक्षण मिळावे यासाठी जाहीर केले आहे ही आणखी अभिमानास्पद गोष्ट आहे असे दिलिप (बापु)धोत्रे यांनी सांगितले, यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, हरिभाऊ जाधव गुरुजी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.