राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी व कार्यसम्राट आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त नगरसेवक विनोद भोसले यांच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा रणरागिनी उपाधीने सत्कार करुण गौरव



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी व कार्यसम्राट आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या प्रेरणा सप्ताह अंर्तगत महराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांच्या वतीने सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिला भगिनींचा शहर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या हस्ते "रणरागिनी" या उपाधीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला.


यावेळी दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष सैफन शेख, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, प्रियदर्शिनी सेल चे श्रद्धा हुल्लेनवरु, प्रियंका डोंगरे, बाबूराव क्षीरसागर, बसुअण्णा कोळी, संतोष अट्टेलुर, राजासाब शेख, राजेन्द्र शिरकुल, शाहु सलगर, शरद गुमटे, नागेश म्याकल, महादेव गायकवाड़, बंडू जाधव, सुभाष वाघमारे, सौरभ सालुंखे, यांच्यासह इतर उपस्थित होते.


यावेळी या कार्यक्रमाचे उद्देश सांगताना नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की सोलापूर शहरातील स्वतःच्या आत्मविश्वासाने, अनेक अडचणीतुन वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठवून इतरांना प्रेरणा देणाऱ्या, समाजात बदल घडवून आणणाऱ्या, महिला भगिनींचा मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आणि या सत्कारमूर्ती मुळे इतरांना प्रेरणा मिळावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील पंधरा महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार असुन आज प्रातिनिधिक स्वरुपात पाच कर्तुत्ववान महिला भगिनी वर्षाताई दामोदर गायकवाड़ (स्कूल व्हॅन चालक), सुप्रियाताई मोरे (रिक्षा चालक), शोभाताई घंटे (रिक्षा चालक), महादेवी जाधव ( नर्स, गरोदर असतानाही कोव्हीड काळात कार्य), अंबिका पानगंडे (रिक्षा चालक) यांचा रणरागिनी या उपाधीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget