अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेना रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडणार?
भरमसाठ इंधन दरवाढी विरोधात शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने कराडचे तहसिलदार मा.अमरदिप वाकडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या महामारी मुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा आर्थिक कणा मोडला असून अशा परिस्थितीत केंद्र सरकार छुप्या पद्धतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गँस सिलेंडरचे दर भरमसाठ वाढवत आहे या गोष्टींचा जनतेच्या वतिने शिवसेना सरकार जाहिर निषेध करत आहे.
सामान्य जनतेच्या मागणीचा तसेच रिक्षा ,ट्रान्सपोर्ट, दुध भाजीपाला वाहतुक करणार्या व्यवसायीकांचाही विचार केंद्र सरकारने त्वरीत करावा. अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेना रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी यावेळी दिला आहे. तसेच निवेदनाची प्रत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री.धरमेंन्द्र प्रधान यांना पाठवण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, तालुका प्रमुख नितीन काशीद-पाटील, शशिकांत हापसे, उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव, संजय चव्हाण, दिलीप यादव,ऋषीकेश महाडिक, शहरप्रमुख शशिराज करपे, अक्षय गवळी, विभाग प्रमुख प्रविण लोहार, महेश कोळी, शाखाप्रमुख साजिद मुजावर, तानाजी साठे व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.