(श्लेषा कारंडे यांच्या मागणीस मिळाले यश)
सोलापूर // प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीने वैयक्तिक मालकीच्या खाजगी जागेत गावठाण क्षेत्र दाखवून अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिली आहे. मात्र नागरिकांना तक्रार केल्यानंतर आतिक्रमन प्रोत्साहित करणाऱ्या या नोंदी रद्द कराव्यात असा आदेश सांगोल्याची गट विकास अधिकारी यांनी महूद ग्रामपंचायतीस दिला आहे.
महूद हे सुमारे वीस हजार लोकसंख्येचे गाव जत मुंबई व पंढरपूर-मल्हारपेठ अशा दोन मुख्य राज्य मार्गाच्या मध्यबिंदूवर स्थिरावली आहे परिसरातील पंधरा-वीस खेड्याची हक्काची बाजारपेठ म्हणून या गावच्या लौकिक आहे. येथे व्यापारी उद्योग यांची बरकत होण्यास मोठा वाव आहे.
विशेषतः महामार्गालगतच्या जमिनी या दृष्टीने महत्त्वाच्या बनवल्या आहेत. महूद ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती देताना श्लेषा कारंडे यांनी सांगितले की, पंढरपूर मल्हार पेठ महामार्गलगत त्यांची वडिलोपार्जित मालकीची वहिवाटीची जमीन आहे.
गट क्रमांक 1927 व 1928 मध्ये कोणतेही गावठाण नाही याबाबत महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाकडील पुराव्यात गावठाण पुराव्याची कसलीही नोंद नाही. तरीही महूद ग्रामपंचायतीने 26 जून 2019 च्या मासिक सभेत ठराव घेऊन या खाजगी मालमत्तेत गावठाण दाखविले आहे. आणि वैयक्तिक मालमत्ता तिच्या जागी दुसर्या व्यक्तीच्या मालमत्ता क्रमांक 3513 ची बेकायदेशीर नोंद केली आहे.
नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याएवजी महूद ग्रामपंचायतीने अतिक्रमणास प्रोत्साहन दिले आहे. अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायत उताऱ्याचा आधार घेत 26 ऑक्टोंबर 2020 पासून या क्षेत्रात अतिक्रमण केले आहे. अगोदर बेकायदेशीर नोंद व नंतर दीड वर्षांनी बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार ग्रामपंचायतीने संबंधित भोगवटादार यांच्याशी संगनमत करून केला आहे. ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर कृत्यविरुद्ध श्लेषा कारंडे यांनी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून ही बेकायदेशीर नोंद रद्द करून अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे अशी मागणी केली दरम्यान गटविकास अधिकारी यांनी याबाबत चौकशी करून या नोंदी रद्द करण्याच्या आदेश ग्रामपंचायतीस दिला असल्याचे श्लेषा कारंडे यांनी माहिती दिली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.