सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर अग्रमानांकित असा भीमा सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे संस्थापक कै. भीमरावदादा महाडिक यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 9 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरु राहणार असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
यावेळी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्याचे नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले.या रक्तदान शिबिराचे आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. मुन्नासाहेब महाडिक व संचालक मंडळाने केले आहे. या रक्तदान शिबिरास भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांनी,कामगारांनी मा. खा.धनंजय महाडिक यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी ऊपस्थित राहून उस्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा व हेल्मेट भेट मिळवून आपला मोटरसायकल्स वरचा प्रवास सुरक्षित करावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रक्ताचा अचानक तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे नमूद करण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.