वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज (०६ डिसेंबर २०२०) निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
रवी पटवर्धन यांचा जन्म ०६ सप्टेंबर १९३७ रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या अनेक भूमिकांमध्ये काम केले. रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास १५० हून अधिक नाटक तर २०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या सर्वच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
रवी पटवर्धन यांनी १९७४ मध्ये आरण्यक हे नाटक केले. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली.
वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.