बळीराजा शेतकरी संघटनेचे नगरपालिके समोर ठिय्या आंदोलन




पंढरपूर // प्रतिनिधी 

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेचे समोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आले गेल्या आठवड्यामध्ये पंढरपूर नगरपालिकेने विस्थापित नगर येथील अतिक्रमण काढताना नागरिकांना आगाऊ सूचना न देता व नोटीस न देता अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये अनेक कुटुंबियांचे नुकसान झाले होते यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी आक्रमक होत हे पाड काम थांबले होते व नगरपालिके समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आज सकाळी अकरा वाजता नगरपालिके समोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी विस्थापित नगर येथील बहुसंख्य गोरगरीब महिला मुले कुटुंबासहित हजर होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे शशिकांत पाटील दीपक पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील सामाजिक कार्यकर्ते उत्तम बाबा चव्हाण संतोष भोसले संदीप माने यांच्यासह बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रशासनातील कोणीही अधिकारी आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले नाहीत परंतु पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांचे पती नागेश काका भोसले यांनी याठिकाणी भेट घेऊन तोडगा काढला व विस्थापित नगरातील कुठल्याही झोपडीला नगरपालिकेचा कर्मचारी हात लावणार नाही असे जाहीर आश्वासन दिले  त्यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असे  बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांनी सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले पंढरपूर शहरामध्ये अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण केलेल आहे त्याअगोदर नगरपालिकेने काढावे मगच गरिबांच्या घराला हात लावा माननीय नागेश काका भोसले यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन हे आंदोलन तूर्तास स्थगित करीत आहोत यावेळी  महिलांनी बळीराजा संघटनेचे आभार मानले व असेच गरिबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असं विस्थापित नगरातील महिला आशाताई कराळे यांनी सांगितले



यावेळी आंदोलनकर्ते बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर, मनसेचे तालुकाध्यक्ष  शशिकांत पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संदिप माने, काका बुराडे, संतोष भोसले व आदी सर्व आंदोलनकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget