सोलापूर प्रतिनिधी :- युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाउंडेशन कडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. या यशामुळे तुमचा तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले.
मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळ ते बोलत होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे प्रदेश सरचिटणिस दिलिप धोत्रे, अविनाश अभ्यंकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, हरिभाऊ जाधव, प्रविण देशमूख, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरे यांनी डिसले कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. शिवाय डिसले गुरुजींच्या पुढील शैक्षणिक कार्यात आवश्यक तेथे मदत करण्याचे अभिवचन दिले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी डिसले गुरुजींनी केलेल्या कार्याचे कौतूक करुन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.