दिनांक 9 डिसेंबर दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य भजन आंदोलन




(सर्व वारकरी संघटना, धार्मिक संघटना, शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, महिला बचत गट, पुरुष व महिला भजनी मंडळ यांनी भजन आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा)


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

वारकऱ्यांच्या वतीने सरकारला शंभर भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमाकरिता परवानगी देण्यात यावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि महाराष्ट्रातील अधिकारी संत मंडळी दररोज फार मोठ्या संख्येने उपोषणाला भेट देण्याकरता येत आहेत पण काल जिल्हाधिकारी पापडकर साहेब यांनी स्पष्ट सांगितले भजन-कीर्तन वरील बंदी सरकारने अजून कायम ठेवलेली आहे म्हणून रीतसर आपल्याला परवानगी देता येणार नाही पण वारकरी अट्टाहास पेटलेले आहेत बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि म्हणून सर्व वारकरी संघटना एकरूप झालेले असून वारकरी संप्रदायाची ताकद सरकारला दाखवण्याच्या उद्देशाने दिनांक नऊ डिसेंबरला दुपारी बारा वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने भव्य भजन आंदोलनाचे आयोजन केले आहे तरी विदर्भाच्या बाहेरील भाविकांनी एवढ्या दूरन  येण्याचा त्रास घेऊ नये पण विदर्भातील सर्व जिल्ह्यातील माळकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे आपण आपल्या गावातील दिंडी सोहळा पुरुष भजनी मंडळ ,महिला भजनी मंडळ, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, महिला बचत गट या सर्व मंडळींनी टाळ, मृदुंग, विना ,चोपदारांनी आपला ड्रेस परिधान करून यावा सर्व माळकरी मंडळींनी वारकरी पोषाखा मध्ये भजन आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा ही कळकळीची नम्र विनंती भजन आंदोलनामध्ये राजकीय नेत्यांनी येऊ नये हि नम्र विनंती आहे पण माळकरी व पंढरपूरचे वारकरी असणाऱ्या सर्वपक्षीय राजकीय नेते जर वारकरी म्हणून आंदोलनामध्ये सहभागी होत असतील तर स्वागत राहील भजन आंदोलनाला येणाऱ्या भाविकांना आमच्याकडून चहा नाश्ता भोजन प्रवास खर्च असली कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आपण स्व खर्चाने आपली व्यवस्था करावी.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget