वृत्तसंस्था // प्रतिनिधी
नव्या कृषि कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिलीय. या घोषणेच्या सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कायदा आणि सुव्यस्था कायम राहावी यासाठी केंद्र सरकराने राज्य सरकारांसाठी निर्देश जाहीर केले आहेत. कोरोना नियमांचे पालन व्हावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलंय.
शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ३ पर्यंत भारत बंदची घोषणा केलीय. यावेळी सर्व दुकानं आणि व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये सर्व मार्केट बंद राहणार आहेत. लग्नाच्या कार्यक्रमांना यातून सूट देण्यात आलीय. रुग्णवाहीका आणि आपत्कालीन सेवा देखील भारत बंदतून वगळण्यात आल्यायत.
हे आंदोलन शांतीपूर्ण होईल. यामध्ये कोणत्याही हिंसक कृत्यास परवानगी नाही. जर कोणी असे करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात कडक कारवाई होईल असे शेतकरी नेते बलदेव सिंह यांनी सांगितले. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गुजरातहून २५० शेतकरी दिल्ली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर शेतकरी आपल्या आंदोलनाची गती आणखी तीव्र करतील असा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते पूर्णपणे बंद करु आणि दिल्लीतील रस्ते पूर्णपणे बंद करु असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.