(महिला कीर्तनकार हि उपोषणाच्या रणांगणात उतरल्या)
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवसाला ही प्रशासनाने व सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे वारकरी संप्रदाय मध्ये सरकारविषयी तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांना भजन कीर्तनाच्या करिता आमरण उपोषण करावे लागते व आत्मदहनाचा इशारा द्यावा लागावा हा फार मोठा कलंक ठाकरे सरकार मुळे महाराष्ट्राला लागलेला आहे. महाराष्ट्र सरकारला जाग येण्याकरिता आमरण उपोषणा मध्ये वारकरी मंडळी काळया फिती बांधून आमरण उपोषण करणार आहेत व वेळोवेळी सरकारला आपल्या हक्क करता भीक न मागता भावी विधानसभेत महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता आम्ही महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री वारकरी करून दाखवणार दिनांक 4 डिसेंबरला आमरण उपोषणा मध्ये महिला कीर्तनकार मंडळींनी सक्रिय सहभाग घेतला त्यामध्ये ह-भ-प अर्चनाताई निंबोकार, ह भ प सविताताई बनतकार, ह भ प गोदावरीताई बड आदि महिला कीर्तनकार व मनोज महाराज टाले, योगेश महाराज तांबडे यांची कीर्तनाची सेवा पार पडली उपोषणाला भेट देण्याकरिता श्री प्रदीप भाऊ वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी,जिप सभापती पंजाबराव वडाळ ,संजय हिवराळे, अवि भाऊ गावंडे,भूषण भाऊ, मंगेश टापरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली व आमरण उपोषणाला साखळी पद्धतीने महादेव महाराज निमकंडे,विठ्ठल महाराज साबळे, राजू महाराज कोकाटे, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर, विजय महाराज राऊत ,गजानन महाराज दहिकर,श्रीधर महाराज तळोकार ज्ञानेश्वर महाराज पातोंड ,राम महाराज गवारे ,शिवा महाराज बावस्कार ,मनोज महाराज टाले, रघुनाथ घुगे, राजू महाराज कोकाटे, सुपेश महाराज पातोडे, किशोर महाराज लळे ,वासुदेव महाराज सावरकर, अमोल महाराज बांगर, पुरुषोत्तम महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज रौराळे,विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे गजानन भाऊ मोडक यांनी साखळी पद्धतीने अमरण उपोषण केले

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.