वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सांगोला येथील बळीराजा शेतकरी संघटनेच्या सांगोला तालुका उपाध्यक्षपदी समाधान आलदर (बोबडे)यांची निवड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर व सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्या सांगोला तालुका उपाध्यक्ष म्हणून समाधान आलदर (बोबडे)यांची नियुक्ती करण्यात आली. गोरगरीब कष्टकरी व दीनदलित दुबळ्या शेतकरी वर्गासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही सांगोला तालुका व आसपासच्या ग्रामीण भागातील प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवताल, असा विश्वास यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) विलास जवळेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, समाजसेवक बाबा चव्हाण, राजेंद्र बुध्याळ, केशव चव्हाण, गोपाळ पाटील, गणेश देशमुख, नितीन काळे, धनाजी बनसोडे,विक्रम तरंगे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.